MNS Vandalism in Municipal Council : नगरपरिषदेत मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड - Vandalism by MNS workers in Beed Municipal Council

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 11, 2023, 4:58 PM IST

बीड : शहरातील मोंढा नाका ते अमरधाम स्मशानभूमी दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) या रस्त्याच्या कामासाठी खड्ड्यांभोवती रांगोळ्या काढून निषेध व्यक्त केला होता. मात्र, मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी याची कोणतीही दखल न घेतल्याने मनसे पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी शुक्रवारी सकाळी अचानक नगरपरिषदेत (Beed Municipal Council) येऊन तोडफोड केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या केबिनमध्ये जाऊन खुर्च्यांची तोडफोड (Vandalism by MNS workers in Beed Municipal Council) केली. यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी सीओच्या केबिनकडे धाव घेतली. त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना पकडून केबिनबाहेर ओढले. या परिस्थितीची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. बीड शहरात स्वच्छता, पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक आक्रमक होत आहेत. मुख्याधिकार्‍यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बिडकरांना सहन करावा लागत असून त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. हा रस्ता येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करू असे आश्वासन नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी निता अंधारे यांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.