Nitin Gadkari : आपला देश हा दुःखी आत्म्याचा महासागर, आमदारांनी बांधले आहे मंत्रीपदाचे बाशिंग - नितीन गडकरी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : सडेतोड आणि थेट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी मार्मिक शब्दात टीका केली आहे. गुरुपौर्णिमा निमित्त विद्यापीठ शिक्षण मांचाच्या कार्यक्रमात त्यांनी तुफान बॅटिंग केली आहे. आपण सगळेजण दुःखाचा महासागरात बुडाले आहोत, कोणीच खुश नाही. अकॅडमी कौन्सिलमध्येजे निवडून आले त्यांना वाटते की, आता पुढे काय, जे नाही निवडून येऊ शकले त्यांना वाटत पुढच्या वेळेस आपल्याचा चान्स मिळतो की नाही. जीवनात आज कुणीही समाधानी नाही. मुळात समाधान हे माणण्यावर आहे. आपण स्वीकार केला की तेव्हाच माणूस आनंदी राहतो. नाहीतर जे नगरसेवक झाले आहे ते याकरिता दुःखी आहे की, आमदार होता आले नाही. आमदार दुःखी आहेत की, त्यांना मंत्री होता आले नाही. आणि मंत्री याकरिता दुःखी आहे मला चांगले खाते मिळाले नाही. आता जे मंत्री होणार होते, ते याकरिता दुःखी आहे आपला चान्स आता येतो की नाही. मंत्रिमंडळाची क्षमता वाढवता येत नाही, आपला देश हा दुःखी आत्म्याचा महासागर आहे, असे म्हणत नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक टोलेबाजी केली आहे.