आमच्या आंदोलनामुळंच राष्ट्रपतींना शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेता आलं - तृप्ती देसाई - राष्ट्रपतींना शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेता आलं

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 9:09 PM IST

शिर्डी (अहमदनगर) Trupti Desai On President Shani Darshan : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी गुरुवारी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलं. आमच्या आंदोलनामुळंच राष्ट्रपतींना चौथाऱयावर जाऊन दर्शन घेता आलं असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या. एवढ्या मोठ्या पदावरील महिला शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन तेलाचा अभिषेक घालतात याचा मला अभिमान असल्याचं देसाई म्हणाल्या. तसेच यावेळी राष्ट्रपतींनी केरळच्या शबरीमाला मंदिरात जाऊनही दर्शन घेण्याची विनंती तृप्ती देसाई यांनी केलीय. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर चढण्यास महिलांना बंदी होती. महिलांना चौथऱ्यावर जाऊ द्यावं यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शनिशिंगणापूर येथे आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर शनिदेव देवस्थाननं महिलांना चौथऱ्यावर जाण्याची परवानगी दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.