Treatment with torch light: प्रतापगड मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये टॉर्चच्या प्रकाशात उपचार - प्रतापगड मेडिकल कॉलेज
🎬 Watch Now: Feature Video
प्रतापगड - येथील मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये गुरुवारी मोठा निष्काळजीपणा दिसून आला. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार करण्यात आले. २४ तास विजेचा दावा करणाऱ्या रुग्णालयात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात उपचार झाल्याच्या घटनेने यूपीच्या आरोग्य सुविधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रतापगड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार सुरू होते. त्याच प्रकाशात आरोग्य कर्मचारी इंजेक्शन देत होते. तसेच मलम, बँडेजसह सर्व उपचार केले जात होते. इमर्जन्सी वॉर्डसह सर्वच वॉर्डांमध्ये रुग्णांना अंधारात राहावे लागत असल्याची परिस्थिती आहे. इमर्जन्सी वॉर्डमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. एकीकडे सरकार आरोग्य सेवेवर लाखो रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे मेडिकल कॉलेजमधून मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ईटीव्ही भारतच्या टीमने त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली असता, तेथील डॉ. संकपाळ हे पाहून हैराण झाले आणि त्यांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. हा पाहा व्हिडिओ..
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST