Leopard Attack News: राखणदारी करणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, मालकाने धाव घेतली अन्... पहा व्हिडिओ - पुण्यात बिबट्यांचा वावर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 2, 2023, 7:06 AM IST

पुणे : पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर वाढला आहे. दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील वारजे परिसरात दिवसा बिबट्या लोकवस्तीत शिरल्यानंतर त्याला वनविभागाच्या वतीने पकडण्यात आले. आत्ता शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे कुत्र्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. तळेगाव ढमढेरे येथे राहणारे बाळासाहेब ढमढेरे यांच्या घराची राखण करणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. हल्ला केल्यानंतर बिबट्या आणि कुत्र्यात झटापट झाली आहे. तो थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे परिसरात असलेल्या लोकवस्तीत सलग तीन दिवस तीन ठिकाणी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट्या शिकारीच्या शोधात बाहेर पडत आहे. येथील शेतकऱ्यांच्या घराबाहेर असलेल्या कुत्र्यावर हल्ला केल्यानंतर त्या कुत्र्याने आवाज केल्याने घरचे जागा झाल्यावर त्याने पळ काढला आहे. बिबट्याच्या वावरणे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. जीवितहानी होण्याच्या आधी वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला पकडावे, अशी मागणी नागरिक करत आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे परिसरार भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा बिबट्याने अनेकांचा जीव देखील घेतलेला आहे. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.