Blue Whale Video : अबब! तब्बल साडेतीन टन वजनी ब्लू व्हेल आली वाहून!...Watch Video - ब्लू व्हेल व्हिडिओ आंध्र प्रदेश
🎬 Watch Now: Feature Video
श्रीकाकुलम - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारपासून पाऊस कमी झाला असला, तरी पाण्याचा प्रवाह अद्याप कमी झालेला नाही. दुसरीकडे, सततच्या पावसामुळे समुद्रही खवळलेला आहे. या खवळलेल्या समुद्राचा जलचरांवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हे दर्शविणारी एक घटना गुरुवारी उघडकीस आली. राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर एका मोठ्या ब्लू व्हेलचे शव वाहून आले. ब्लू व्हेल सुमारे 24 फूट लांब होता. तर त्याचे वजन सुमारे साडेतीन टन असल्याचे सांगितले जात आहे. व्हेल किनाऱ्यावर आला तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता, असे मच्छिमारांनी सांगितले. या ब्लू व्हेलला पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने समुद्रकिनाऱ्यावर जमले होते. पहा हा व्हिडिओ..