Ahmednagar Crime: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करत लुटले.... - पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर : जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर उधार पेट्रोल दिले नाही म्हणून, पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून गुंडानी पळ काढला. या मारहाणीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मात्र सामान्य नागरिक भयभीत झाले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. उधार पेट्रोल दिले नाही म्हणून, या गुंडांनी कर्मचाऱ्यांना लाकडी दांडक्यासह लोखंडी गजाने मारले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात गुंडावर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये या गुंडांच्या टोळक्याकडून सातत्याने सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या घटनेत वाढ होत आहे.