VIDEO रस्त्यावरील खड्ड्यात केली उसाची लागवड.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन - अधिकाऱ्यांना कोंडू असा इशारा
🎬 Watch Now: Feature Video
सांगली: सांगली पेठ रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनोखे आंदोलन करण्यात Swabhimani Shethkari Sanghtana protest आले. रस्त्यावरील खड्यात उसाची लागवड आणि वृक्षारोपण करण्यात आले sugarcane Plantation on Sangli Peth road potholes आहे. सांगली - पेठ रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले असून याकडे दूर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. सदर मार्गावर खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित असून राष्ट्रीय प्राधिकरणकडे या रस्त्याची जबाबदारी असल्याने यामध्ये अडचण येत आहेत. परिणामी रस्त्याचा दुरुस्तीचा प्रश्न रेंगाळला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्त्यावर ऊसाची लागवड व वृक्षारोपण करत निषेध नोंदवला जात आहे. तातडीने रस्ता दुरुस्ती काम करावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST