ऊसदरासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; पुणे-बंगळूरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन, पाहा व्हिडिओ - सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 23, 2023, 1:11 PM IST
कोल्हापूर Agitation For Sugarcane Rate : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाला दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी चार बैठका घेण्यात आल्या. मात्र, अद्यापही ऊस दराबाबत कोणताच तोडगा निघाला नाही. दरम्यान, ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी (22 नोव्हेंबर) मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांची घेतलेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळं ऊस दरासाठीचं आंदोलन सुरूच राहणार आहे. तसंच या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज (गुरुवारी) पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्याची घोषणा संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान, मागील आंदोलनाचा विचार करता या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.