Sudha Murthy in Sindhudurg : ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांसाठी मराठी सासुबाईचे देवीला साकडे, पाहा... - एन आर नारायणमूर्ती
🎬 Watch Now: Feature Video
सिंधुदुर्ग : इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापक सुधा मुर्ती ( Sudha Murty ) या कोकणातील देवगड तालुक्यातल्या बापार्डे गावात दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी गावची ग्रामदेवत दुर्गादेवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी चक्क आपले जावई ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक ( British PM Rishi Sunak ) यांच्यासाठी ओटी भरून गाऱ्हाणे घातले आहे. अत्यंत साध राहणीमान मराठमोळ्या वातावरणात रमणाऱ्या व जागतिक पातळीवरील मोठे नाव असलेल्या इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर. नारायणमूर्ती ( N R Narayan Murthy ) यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांनी यावेळी बापर्डे येथील पुरातन असलेल्या श्री दुर्गादेवीचे ( Shri Durga Devi ) दर्शन घेतले. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांचे श्री दुर्गादेवी हे श्रद्धास्थान आहे. आपले जावई ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्यासाठी त्यांनी यावेळी प्रार्थना करून आशिर्वाद घेतला. यावेळी खास कोकणातील पारंपरिक पध्दतीने गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी त्यांनी यशवंतराव राणे माध्यमिक विद्यामंदिर मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अतिशय दुर्गम भागात असलेल्या या शाळेत सुधा मूर्ती विद्यार्थ्यांच्या भेटीला आल्याने सर्वांमध्येच उत्सुकता होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST