Cobra Surgery : प्लास्टिक गिळलेल्या कोब्रावर यशस्वी शस्त्रक्रिया; पाहा व्हिड़िओ - प्लास्टिक गिळलेला कोब्रा
🎬 Watch Now: Feature Video
कर्नाटक - मंगळुरूमध्ये एका तरुण डॉक्टरने प्लास्टिकचा बॉक्स गिळल्यानंतर जखमी झालेल्या कोब्रावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. सालुमरदा थिम्मक्का पार्कजवळील कवलपदूर ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा वासंती यांच्या घराजवळ हा कोब्रा आढळून आला. सर्प मित्र किरणने जखमी कोब्राला मंगळुरूचे पशुवैद्य डॉ. यशस्वी नरवी यांच्याकडे उपचारासाठी आणले. कोब्रावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सापाचे पोट फुगल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी त्याचा एक्स-रे केला. तेव्हा त्याच्या पोटात प्लॅस्टिकची वस्तू असल्याचे दिसून आले. त्यामुळे सापावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातील चुन्याची प्लास्टिकची डबी यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली. हा सुमारे पाच फूट लांब कोब्रा होता. अंडी गिळताना त्याने त्यासोबत प्लास्टिकची डबी गिळली असावी. शस्त्रक्रियेनंतर 15 दिवसांनी कोब्राला वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार सर्प मित्र किरणने पुन्हा जंगलात सोडले आहे.