thumbnail

By

Published : Mar 31, 2023, 1:40 PM IST

ETV Bharat / Videos

Pahur Shendurni Road Accident : जामनेर शेंदुर्णी रस्त्यावर स्कूल बसचा अपघात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

जळगाव: शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. आज सकाळी पहूर शेंदुर्णीच्या रस्तावर शाळेची बस उलटल्याने अपघात घडला. सरस्वती विद्या मंदिरची ही स्कूल बस होती. या बसचा क्रमांक एमएच-१९ वाय-५७७८ हा होता. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन बस विद्यालयाकडे येत होती. बसच्या खालच्या बाजूचा पाटा तुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस झाडाला धडकली. स्कूल बसचेही नुकसान झाले आहे. अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या अपघातामुळे यातील विद्यार्थी आणि शिक्षकांना नेमके काय होतेय हे काहीही समजले नाही. तर बस आदळल्यानंतर जोरदार हादरा बसल्याने अनेकांना इजा झाली. बसमधून सर्व बाहेर रस्त्यावर आले. जखमींना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची चौकशी पोलीस करत आहे. अपघात मोठा अनर्थ टळला आहे. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.