ठाण्याहून चंदगडकडे निघालेल्या एसटीचा कोल्हापुरात भीषण अपघात; 15 प्रवासी जखमी - टोप फाटा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 11:12 AM IST

Updated : Nov 27, 2023, 12:11 PM IST

कोल्हापूर ST Bus Accident in Kolhapur : ठाण्याहून चंदगडकडे निघालेल्या एसटीचा कोल्हापुरात भीषण अपघात झालाय. या अपघातात दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले असून जखमींना छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा अपघात आज सकाळी साडेचार वोजेच्या सुमारास कोल्हापूरजवळील टोप फाटा इथं झाला असून चालकाचा एस टी वरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  


नियंत्रण सुटल्यानं बस आदळली : ठाण्याहून कोल्हापुरातील चंदगडकडं तब्बल 25 प्रवाशांना घेऊन एसटी क्रमांक MH 09 FL 0967 ही बस निघाली होती. सकाळच्या सुमारास ही बस कोल्हापुरातील शिरोलीजवळ टोप फाटा इथं पोहोचली. बस मधील सर्व प्रवासी हे झोपेत असतानाच चालकाचं एस टी वरील नियंत्रण सुटल्यानं ही बस अचानक पूर्वेच्या बाजूस असलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला जाऊन धडकली व पलटी झाली. अपघात होताच मोठा आवाज आला. यामुळं परिसरातील नागरिक त्वरित मदतीसाठी धावून गेले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला कळविण्यात आली. या अपघातात साधारण दहा ते पंधरा जण जखमी झाले असून सर्वांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातात एसटी चालक देखील जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागलाय. दरम्यान, जखमींच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात गर्दी केली आहे. 

Last Updated : Nov 27, 2023, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.