प्लास्टिकची पिशवी गिळल्यानं साप मोजत होता मृत्यूच्या घटका, पहा सर्पमित्रानं कसे वाचविले प्राण?

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 7:33 AM IST

पिंपरी चिंचवड Snake Eaten Plastic Bag : पिंपरी चिंचवडमध्ये सापानं प्लास्टिकची पिशवी गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सापानं गिळलेली पिशवी प्लास्टिकची असल्यानं सापाला ती पचवता आली नाही.  त्यात ती घशात अडकल्यानं सापाला श्वासही घेता येत नव्हता.त्यामुळं काही दिवसातच या सापाचा मृत्यू झाला असता.  मात्र सर्पमित्रांनी या सापाच्या घशातील प्लास्टिक पिशवी काढली अन् त्याचा जीव वाचवला. सापानं प्लास्टिक गिळल्याची बहुतेक ही पहिलीच घटना असावी.  पण धामणनं प्लास्टिक पिशवी का गिळली हा प्रश्न सध्या समोर येत आहे. सापानं प्लास्टिक पिशवी का गिळली असावी? साप प्लास्टिक खातो का? सापांना प्लास्टिक पचतं का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळं उभं राहिलेत. आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन वस्तू मागवतात.  त्यात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्लास्टिक पिशवीने रॅप केलेले असतात.  आपण पदार्थ काढून घेऊन पिशव्या रस्त्यावर टाकतो.  त्या पिशव्यांना खाद्य पदार्थांचा वास तसाच राहतो.  त्या वासामुळे जनावरे पिशव्या खातात. अशाच पद्धतीने प्लास्टिक बॉटल आणि त्याची झाकणे आपण उघड्यावर फेकतो. त्यामध्ये अडकून अनेक मुके जीव नाहक मरतात.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.