viral video : नागाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल; जीवाचा धोका पत्करून तरूणांचा खेळ - नागाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ वायरल
🎬 Watch Now: Feature Video
नागपंचमी ( Nagpanchami ) हा विशेष नागाच्या पूजनाचा सण असतो. मात्र आताच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये नागाला हॅपी बर्थडे नागोबा ( Happy Birthday snake) असे म्हणत नागाचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल ( snake birthday celebration video went viral ) झाला आहे. जवळपास पाच ते सहा तरूण नागाच्या जवळ उभे राहून हॅपी बर्थडे म्हणताना दिसत आहेत. फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी या तरूणांनी नागाजवळ उभे राहण्याचा धोका पत्करला आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते अद्याप स्पष्ट नाही. व्हिडिओत सुदैवाने कुठलाही अनूचित प्रकार घडल्याचे दिसत नाही. मात्र हॅपी बर्थडे नागोबा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST