Shivshahi Bus Caught Fire: नागपूर- अमरावती महामार्गावर शिवशाहीने घेतला पेट, थोडक्यात 16 प्रवाशांचे वाचले प्राण - Amravati highway in Nagpur
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : अमरावती महामार्गावर एका शिवशाही बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळीजवळ असलेल्या साई बाबा मंदिराजवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे झाल्यामुळे आग लागली असावी, हा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या बसमध्ये 16 प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी आणि बसचालक व वाहक बसमधून खाली उतरल्याने अनर्थ टळला. तर या आगीत काही प्रवाशांचे सामान जळाल्याची माहिती समोर आली आहे. एमएच 06 बीडब्लयु 0788 क्रमांकाची बस आज सकाळी गणेशपेठ आगारातून अमरावतीच्या दिशेने जात होती. त्यावेळी कोंढाळी येथून बस पुढे जात असताना अचानक इंजिनमध्ये आगीचे लोट येत असल्याचे निदर्शनास आले. लगेच बसचे चालक अब्दुल जहीर शेख यांनी बस रस्त्याच्या कडेला थांबवली. वाहक उज्वला देशपांडे यांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात यश मिळवले. घटनेची माहिती समजताच कोंढाळी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखले होते.