Video शिवशाही बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने 42 प्रवाशांचे वाचवले प्राण - चालकाने 42 प्रवाशांना वाचवले
🎬 Watch Now: Feature Video
पुणे पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर येथे एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना Shivshahi Bus Caught Fire Fire Breaks Out घडली आहे. गाडी खराब झाल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील 42 प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्याची माहिती मिळत आहे. तर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळ ते चिंचवड या मार्गावर धावणाऱ्या एस. टी. विभागाच्या शिवशाही बसने पेट घेतला असून यातील सर्व प्रवासी हे सुखरूप आहे.येरवडा येथील शास्त्रीनगर येथे गाडी आल्यावर गाडी खराब झाली म्हणून चालकाने गाडी बाजूला लावून बस मधील 42 प्रवश्यांना खाली उतरावल आणि त्यानंतर अचानक बस ने पेट घेतली आहे.अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST