Shivsena MLA Nitin Deshmukh : जबरदस्तीने इंजेक्शन देऊन मला सुरतमध्ये रोकून ठेवले - आमदार नितीन देशमुख - आमदार नितीन देशमुख
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरात येथे गेलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख ( Shivsena MLA Nitin Deshmukh ) हे बुधवारी (दि. 22 जून) सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला काहीही झालेले नाही. मी त्या हॉटेलमधून रात्री तीन वाजता निघालो होते. त्यावेळी शेकडोच्या संख्येने गुजरात पोलीस आले व मला जबरदस्ती उलचून सुमारे 25 दवाखाने फिरवले. जबरदस्तीने माझ्या दंडात इंजेक्शन देण्यात आले व मला हृदयविकाराचा झटका आला, अशी अफवा पसरवली. मी बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक होतो आणि आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST