Shirdi Guru Purnima festival 2023: शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवास भक्तिमय वातावरणात सुरुवात, साईनामाचा जयघोष करत पालख्या झाल्या दाखल - special event Shirdi
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी : शिर्डीत गुरूपोर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांना आपला गुरू मानत असंख्य भाविक साईचरणी आपली भक्ती प्रकट करतात. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साई चरित्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली. द्वारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन गुरूपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवानिमीत्त साईमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डीत गुरूपोर्णिमा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. आज पहाटे काकड आरतीनंतर साईंच्या मुर्तीस आणि समाधीस मंगल स्नान घालण्यात आले. त्यानंतर साईंच्या मंदीरातुन साईंचा फोटो, विणा आणि साई चरित्राच्या ग्रंथाची मिरवणुक साई मंदीरातुन गुरुस्थानमार्गे द्वारकामाईत नेण्यात आली. द्वारकामाईत विधीवत पुजा करत साई चरीत्राच्या अखंड पारायणाच्या पठणास सुरवात करण्यात आली. साई चरित्राचा पहीला अध्याय साई संस्थानचे जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य सिध्दाराम सालीमठ यांनी पठण केला. त्यानंतर इतर भाविक साईच्या चरीत्रास अखंड पठण करणार आहेत. सोमवारी सकाळी या पठणाची सांगता केली जाणार आहे. गुरूपोर्णिमा उत्सवाच्या निम्मीताने साई मंदिर परीसर आणि गर्भगृहास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. साईसमाधी गुरू पौर्णिमेनिमित्त रात्रभर खुली राहणार आहे.