Shah Rukh Khan Birthday : आज अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस; 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; पाहा व्हिडिओ - fans crowd outside mannat at midnight
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 2, 2023, 7:54 AM IST
|Updated : Nov 2, 2023, 8:16 AM IST
मुंबई Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या चाहत्यांनी मध्यरात्रीपासून मन्नत बंगल्यासमोर गर्दी केली. आपल्या लाडक्या किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्रीच त्याच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. यावेळी 'मन्नत'च्या बाहेर फटाके फोडून चाहत्यांकडून आतिषबाजी करण्यात आली. तसंच काहीजणं त्याच्यासाठी भेटवस्तू घेऊन आले. तर काही पोस्टर घेऊन तेथे चाहते पोहोचले. चाहत्यांचं हे प्रेम बघून शाहरुख खान स्वतः मन्नतच्या रेलिंगवर उभा राहिला अन् त्यानं सर्वांच्या शुभेच्छा स्विकारल्या. शुभेच्छांचा स्वीकार करत असताना त्यानं त्याची खास असलेली नेहमीची पोझ दिली. तसंच यावेळी शाहरुखनं आपल्या मोबाईलमधून चाहत्यांच्या गर्दीसोबत सेल्फीदेखील घेतला. दरम्यान, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शाहरुख खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.