Sanjay Gaikwad News: अवकाळी पावसाचा हाहाकार, मात्र पालकमंत्री कुठे आहेत?; स्वाभिमानीच्या प्रश्नांवर संजय गायकवाड यांचे प्रत्युत्तर - Ravikant Tupkar

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 22, 2023, 11:20 AM IST

बुलाडाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. बुलडाणा जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील अद्याप जिल्ह्यात फिरकले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री गुलाब पाटील हरवले आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर का जात नाहीत, यावर आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. एका मंत्र्यांकडे चार-चार पाच-पाच जिल्ह्याचे पालकत्व असल्याने ही अडचण होत आहे. भाजप शिवसेनेचे आमदार खासदार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे आमदार खासदार सक्षम असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत. जेव्हा आम्ही कमी पडू तेव्हा आम्ही पालकमंत्र्यांना बोलावू असेही संजय गायकवाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.