साई मंदिरात वर्धापन दिनानिमित्त 14 टन लाडूंचे प्रसाद म्हणून वाटप - religious programs Organize in temple

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 20, 2022, 10:25 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ठाणे ठाण्यातील वर्तक नगर साईनाथ सेवा समितीच्यावतीने दरवर्षी वर्धापनदिनी येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. गेले दोन वर्षे कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे हा उत्सव झाला नसल्याने भक्तांमध्ये एक प्रकारची उदासीनता आली होती. परंतू आता सर्व निर्बंध उठल्यानंतर भक्तांनी मोठ्या उत्साहाने हा वर्धापन दिन साजरा करण्याचे ठरवले होते. म्हणूनंच यंदा 14 टनाचे लाडू वाटले जाणार 14 tons Prasad of Ladoo Sainath Seva Samiti आहेत. मंदिराचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकर यांनी 1986 साली मंदिराची स्थापना केली व यंदा मंदिराचा 36 वा वर्धापन साजरा करण्यात येत आहे. या उत्सवाला असंख्य साईभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार असून त्यांना शिर्डी प्रमाणेच प्रसाद म्हणून लाडू देण्यात येणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध यज्ञ, भजन व महिलांसाठी अनेक कार्यक्रम असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मंगेश नईबागकर यांनी religious programs Organize in temple सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.