Sadabhau Khot Criticized: शिंदे गटाला गद्दार म्हणून संबोधने हे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक - सदाभाऊ खोत यांची टीका - Buldhana News
🎬 Watch Now: Feature Video
बुलढाणा : सध्या पन्नास कोटी एकदम ओके आणि वारंवार शिंदे गटाला गद्दार म्हणून संबोधने हे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होत आहे. तसेच याच्याशी जनतेला काहीच घेणे देणे नाही. तर उद्धव ठाकरे यांनी जी गद्दारी केली ती फक्त गद्दारी नसून महागद्दारीच म्हणावी लागेल. त्यांनी जे पेरल तेच उगवले अशी टीकाही माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाण्यात केली. शेतकऱ्यांच्या मेळावा कार्यक्रम संबंधित ते बुलडाण्यात आले होते, त्यावेळेस ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच शरद पवारांनाही निशाणा साधत त्यांनी शरद पवार काय मिठाईवाले आहे की, उद्धव ठाकरे त्यांच्याकडे गेले, अशी मार्मिक टीकाही त्यांनी शरद पवार यांना उद्देशून केली. तसेच हायवे व्हायच्या आधी जमीनी खरीदी केल्याचे ते म्हणाले.