Mumbai Half Marathon 2023: सचिन तेंडुलकरने दाखवला मुंबई हाफ मॅरेथॉन 2023 ला झेंडा, पहा व्हिडिओ

By

Published : Aug 20, 2023, 9:51 AM IST

thumbnail

मुंबई :  आज मुंबई हाफ मॅरेथॉन 2023 स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये सर्व स्तरातील 20,000 धावपटू सहभागी झाले आहेत. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जिओ गार्डनमध्ये स्पर्धेसाठी सचिन तेंडुलकरने झेंडा दाखविल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.  'रन एजलेस, रन फियरलेस' अशी आजच्या या स्पर्धेची थीम आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाला, एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स मॅरेथॉन मागील 7 वर्षांपासून आयोजित केली जाते. यावर्षी सर्वाधिक धावपटू सहभागी झाले आहेत. या हाफ मॅरेथॉनसाठी धावपटूंमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून आले. सचिन तेंडूलकर स्पर्धकांना प्रोत्साहित करत होता. जेव्हा धावण्याचा विचार येतो, तेव्हा बरेच लोक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जातात. काहींना सरावाचे वेळापत्रक सांभाळण्याची व  काहींना त्यांच्या आहाराची तर काहींना त्यांच्या फिटनेसची चिंता असते, असं तेंडुलकरनं म्हटले. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.