RTO Checking On Samruddhi Highway : वाहन सुस्थितीत असेल तरच समृद्धी महामार्गावर प्रवेश, आरटीओकडून तपासणी सुरू - सिंदखेड राजा टोल प्लाजा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 22, 2023, 2:52 PM IST

Updated : Apr 22, 2023, 3:06 PM IST

बुलडाणा : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा टोल प्लाजावर सकाळपासून उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे. समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आला असून सकाळपासून सिंदखेड राजा येथील टोल नाक्यावर प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यात वाहनांचे टायर्स, वाहनांची परिस्थिती, वाहनांचा आवाज, सीट बेल्ट इत्यादी बाबी तपासून जर सुस्थितीत वाहन असेल तरच समृद्धी महामार्गावर प्रवेश देण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यात समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अपघातात 17 जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आता वाहन तपासणी मोहीम राबवली जात आहे. यात अनेकदा टायर फुटून तर कुठे वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झालेले आहेत. म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाने आता चालकांचे समुपदेशनही सुरू केले आहे.

हेही वाचा - Akshaya Tritiya 2023: श्री सिद्धिविनायक मंदिरात हापूस आंब्याची आरास, अक्षय्य तृतीयेनिमित्त सजला गाभारा

Last Updated : Apr 22, 2023, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.