Vijay wadettiwar: राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत...विजय वडेट्टीवार यांचा घरचा आहेर - MIT College Pune

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 7:05 PM IST

पुणे Vijay wadettiwar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या बाबतीत एक आश्चर्यकारक वक्तव्य (Vijay wadettiwar On Rahul Gandhi) केलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांचं उदाहरण देत, राहुल गांधी हे उच्च शिक्षित आहे पण ते चांगले वक्ते नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. पुण्यातील एमआयटी महाविद्यालय (MIT College Pune) येथे राजकीय नेतृत्व आणि सरकार मधील मास्टर्स प्रोग्रामच्या 19 व्या बॅचच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, 6 टर्म मी आमदार आहे. कधीही ब्रेक झालेलं नाही. तुम्हाला चांगलं वक्ता होणं पाहिलं गरजेचं आहे. आज राहुल गांधी उच्च शिक्षित आहे, पण ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे राजकारणात यशस्वी होण्यासाठी चांगलं वक्ता होणं खूप गरजेचं असल्याचं यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.