Cheetah Project : डोळ्यावर पट्टी बांधून, फिटनेस चाचणीनंतर चित्ता भारतात आले, पाहा चित्त्यांचा संपूर्ण प्रवास - चित्ता भारतात आणण्याची संपूर्ण प्रवास
🎬 Watch Now: Feature Video
भारताची 70 वर्षांची प्रतीक्षा संपली ( Cheetah Project) आहे. नामिबियातील चित्ते शनिवारी सकाळी ८ वाजता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला पोहोचले ( African Cheetahs Landed Gwalior From Namibia) आहेत. पण हे चित्ते नामिबियातून भारतात कसे आणले गेले यावर एक नजर टाकूया. या चित्त्यांना भारतात आणण्यापूर्वी नामिबियाच्या जंगलात शांत करण्यात आले होते. भूल देण्याचे इंजेक्शन दिले. औषधोपचारानंतर सर्व चित्त्यांना वन रुग्णालयात आणण्यात आले. जिथे पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने चित्त्यांची वैद्यकीय चाचणी केली. उड्डाण करताना पूर्ण दक्षतेने चित्त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. पुन्हा एकदा चित्त्यांची फिटनेस तपासण्यात आली. त्यानंतर हे विमान चित्तांसह भारताकडे रवाना झाले. कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार (kuno National Park) आहे. चित्ता भारतात आणण्याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओमध्ये (Process of cheetahs coming to India) पहा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST