Prakash Ambedkar On Congress : 'काँग्रेसवाल्यांनी आमच्या नादी लागू नये', प्रकाश आंबेडकरांचा इशारा
🎬 Watch Now: Feature Video
बीड Prakash Ambedkar On Congress : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. बीड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधींना निर्णय घेता येत नाहीत. त्यांना निर्णय घेणं काँग्रेसवाल्यांनी शिकवावं. ज्याला निर्णय घेता येत नाहीत ते देशाचे नेतृत्व कसं करणार? काँग्रेसवाल्यांनी आमच्या नादी लागू नये. येणाऱ्या काळात इंडिया आघाडी टिकेल की नाही, याची आम्हाला शंका आहे. काँग्रेसवाल्यांना मोदींना विचारावं लागतं की, आम्ही वंचित बहुजन आघाडीला बरोबर जावं की नाही. मोदींनी बापात बाप आणि लेकात लेक नाही, अशी परिस्थिती झालीय. काँग्रेसवाल्यांना प्रेम करायचं शिकवलं पाहिजे, कारण त्यांना मोदींच्या परवानगीशिवाय काहीही करता येत नाही. त्यामुळं आम्ही या वेळेस आमचा वेगळा मार्ग आखणार आहोत. तसंच सध्या राज्यांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचं वातावरण आहे. मनोज जरांगे यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. आमचं आरक्षण बाजूला ठेवून मराठा समाजाचं वेगळं ताट असलं पाहिजे. सध्या सत्तेतील मराठे हे निजामी मराठी आहेत. तर बाकीचे हे रयतेतील मराठे आहेत. सध्या राज्यात अनेक घोटाळे चालू असून येणाऱ्या काळात हे घोटाळे आम्ही उघडकीस आणणार, असा प्रकाश आंबेडकर यांनी इशारा दिला.