Kolhapur bandh: कोल्हापूर बंदमध्ये जमाव आक्रमक; पोलिसांकडून लाठीचार्ज - कोल्हापूर बंदमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणातून कोल्हापुरातील दोघांना मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. आज सकाळी कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन बंदचे आवाहन केले. मात्र मंगळवारी ताब्यात घेतलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी केली. यानंतर आक्रमक जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले, महापालिका चौकाजवळ आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धरपकड झाली. यावेळी आक्रमक झालेल्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. वातावरण अतिशय चिघळलेले आहे. प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यानंतर पोलीस बळाचा वापर करून तरुणांना पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. 19 जूनच्या रात्री बारापर्यंत बंदी आदेश लागू केलेला आहे.