Patnil Forest Department Elephant Camp पातानील हत्ती कॅम्प मधील ३ हत्ती गुजरातमधील जामनगरला रवाना - Reliance Industries Zoo Jamnagar
🎬 Watch Now: Feature Video
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पातानिल येथील वनविभागाच्या Patanil Forest Division हत्ती कॅम्पमधील ३ पाळीव हत्ती Patnil Elephant Camp आज (शुक्रवार) मध्यरात्री गुपचूप गुजरातमधील जामनगरला हलविण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातमधील जामनगरच्या भागात मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या Reliance Industries माध्यमातून देशातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय Reliance Industries Zoo Jamnagar सुरु करण्यात येत आहे. सुमारे २५० एकर जागेतील या प्राणीसंग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मीळ प्राणी नेण्याची प्रक्रिया या वर्षाच्या प्रारंभीच सुरु झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST