Parrot Shouting Modi Jindabad : काय सांगता! हा पोपट म्हणतो 'मोदी सरकार जिंदाबाद', Watch Video - पोपट
🎬 Watch Now: Feature Video
जमुई (बिहार) : बिहारच्या जमुई जिल्ह्यातील एक पोपट सध्या तुफान चर्चेचा विषय बनला आहे. हा पोपट चक्क 'जय श्री राम' आणि 'मोदी जिंदाबाद'चे नारे देतो. एवढेच नाही, तर हिंदुस्थान असे ओरडल्यावर पोपट 'जिंदाबाद' म्हणतो. चार वर्षांपूर्वी मंटू साव नावाच्या व्यक्तीने हा पोपट जंगलातून आपल्या घरी आणला होता. जिल्ह्यातल्या तेतारिया गावातील या मजूर शेतकऱ्याने आपल्या पाळीव पोपटाला अशाप्रकारे प्रशिक्षण दिले आहे की, पोपट 'हिंदुस्थान जिंदाबाद' यासह 'मोदी सरकार जिंदाबाद' आणि 'जय श्री राम'चे नारे देतो. एवढेच नाही तर तो भूक लागल्यावर अन्न आणि तहान लागल्यावर पाणी मागतो. हा पोपट 100 वेगवेगळ्या बोली बोलतो. मालक मंटू हा मोदींचा चाहता आहे, त्यामुळे आता त्याचा पोपटही मोदींचा चाहता बनला आहे. पाहा हा व्हिडिओ..