Nitin Gadkari Shopping : आजोबा गडकरींनी नातीसाठी केली शॉपिंग! पाहा व्हिडिओ - नितीन गडकरी नातीसाठी शॉपिंग
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात आपल्या नातीला वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी शॉपिंग केली. त्यांनी त्यांची दोन वर्षीय नात कावेरीच्या वाढदिवसासाठी सायकल खरेदी केली. यावेळी ते आपल्या नातवंडांची फर्माईश पूर्ण करण्यात रमलेले बघायला मिळाले. यावेळी नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन गडकरी व इतर नातवंडांचा गोतावळा होता. चक्क नितीन गडकरी हेच दुकानात आले म्हटल्यावर हे दुकानदार देखील आवक झाले होते. या आधी देखील नितीन गडकरी आपल्या नातवंडांसाठी शॉपिंग करताना दिसून आले आहेत. प्रसंग गणेशोत्सवाचा असो, पोळा असो किंवा दिवाळी, नितिन गडकरी अनेकदा नातवंडांना घेऊन शॉपिंगसाठी बाहेर पडतात. आज त्यांनी सहकुटुंब बाजारात नातीसाठी शॉपिंग केली. तसेच ते कधी संपूर्ण कुटुंबासह हॉटेलमध्ये देखील जेवणासाठी जातात.