Sharad Pawar Resign: शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष - Sharad Pawar
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला. शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद पाहावयास मिळाला. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते खूप आनंदी झाले. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी सर्वजण करत होते. अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते, बऱ्याच ठिकाणी आंदोलने देखील झाली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते प्रचंड भावनिक झाल्याचे पाहावयास मिळाले होते. पक्षाचे कार्यकर्ते राजीनामा मागे घ्यावा, यासाठी मोठ्या प्रमाणात आग्रही आहेत. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती देखील समोर येत आहे. कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला या घोषणा देखील कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.