NCP Political Crisis : आम्ही नेहमी शरद पवारांसोबत; राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांची पवारांच्या घराबाहेर घोषणाबाजी - Maharashtra Political Crisis

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 2, 2023, 10:55 PM IST

पुणे: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. 30 आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. (Reaction Of NCP Youth) नऊ आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी पुन्हा सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडत ही पक्षाची भूमिका नाही, असे सांगितले आहे. (we are with Sharad Pawar) यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमू लागले आहे. त्यांनी यावेळी आम्ही सदैव शरद  पवार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. आमचे प्रेरणास्थान हे फक्त शरद पवारच असल्याचे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. (slogans of NCP workers) अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण वाटतो? असा प्रश्न यावेळी पवार यांना विचारण्यात आला होता. यावर शरद पवार यांनी स्वत:चा हात उंचावत 'शरद पवार' असे उत्तर दिले आहे. हाच व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला असून ‘प्रेरणास्थान’ असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. यावेळी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने घेतलेला हा आढावा...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.