महाराष्ट्राच्या भूमीवर दिसलं भारतीय नौदलाचं सामर्थ्य, पंतप्रधान मोदी अवाक्; हा Video पाहाच
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 4, 2023, 10:52 PM IST
सिंधुदुर्ग Navy Day Celebration : सिंधुदुर्गात ४ डिसेंबर रोजी भारतीय 'नौदल दिन' साजरा करण्यात आला. येथील तारकर्ली समुद्रकिनारी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर भारतीय नौदलाच्या जहाज, विमानं आणि विशेष दलांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक असल्याचं सांगितलं. "शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाचा पाय रचला. त्यामुळेच नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर शिवरायांच्या राजमुद्रेची छाप आहे", असं ते म्हणाले.