Narayan Rane : मराठा समाजाबद्दल नारायण राणेंचं शिवराळ विधान; मराठा कार्यकर्ते आक्रमक - मराठा आरक्षण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 28, 2023, 8:16 PM IST
सातारा Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा बांधवाशी बोलताना मराठा समाजाबद्दल केलेल्या शिवराळ वक्तव्याची (Narayan Ranes Controversial Statement) ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावरून मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. साताऱ्यातील पाटणमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनस्थळी नारायण राणेंच्या फोटोला (Narayan Rane Photo) चपलांचा हार घालून फोटो जाळण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राणेंनी पत्रकार परिषदेत बोलताना ९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळा आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही. मी मराठा असून आयुष्यभर कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असं म्हटलं होतं. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर रवींद्र मुठे हे मंत्री राणेंशी फोनवर बोलत असताना राणेंनी मराठा समाजाविषयी केलेल्या शिवराळ वक्तव्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.