Nanded District : धोकादायक ! जीव धोक्यात घालून नागरिकांचा पाण्यातून प्रवास

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 18, 2022, 9:27 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील ( Nanded District ) लोहा तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायती ( Dhanora Gram Panchayat ) अंतर्गत येणाऱ्या अनेक वसाहतींना स्वातंत्र्यापासून साधा रस्ता ( Road ) मिळालेला नाही. त्यामुळे गांधीनगर, सुभाषनगर, शिवाजी तांडा इथल्या शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून, पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांसह ( school boy ) आजारी पडलेल्या नागरिकांना गावाबाहेर ये- जा करताना जीव मुठीत धरून ओढ्याच्या पाण्यातून जावे लागत आहे. या भागातील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी असंख्य वेळा शासन ( Government ) दरबारी अर्ज विनंत्या केल्या आहेत. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता या गावकऱ्यांनी ( villagers ) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.