Mushrif's allegation : बेळगावकडे निघालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लाठीचार्ज झाल्याचा मुश्रीफांचा आरोप; सीमाभागात तणाव

By

Published : Dec 19, 2022, 2:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

thumbnail

बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी आज कोगणोळी टोल नाक्याच्या अलीकडेच रोखले आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ Hasan Mushrif तसेच ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्यासोबत सुद्धा पोलिसांची झटापट झाली असून यावेळी लाठीहल्ला सुद्धा झाला. दरम्यान, कर्नाटक पोलिसांकडून हसन मुश्रीफ यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.