महापरिनिर्वाण दिन; बाबासाहेबांच्या अनुयायांच्या सेवेसाठी महानगरपालिका सज्ज, 6 डिसेंबरला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 9:25 PM IST

मुंबई  Mahaparinirvan Day 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या अनुयायांचा जनसागर दादर येथे लोटला आहे. त्यांच्या सुविधांसाठी महापालिका प्रशासनाने चैत्यभूमी, शिवाजी पार्क, राजगृह यासह आवश्यक ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनुयायांसाठी तात्पुरते निवारा कक्ष दादरच्या शिवाजी पार्क येथे उभारण्यात आले असून, त्यासोबतच व्हीआयपी कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, स्थानगृह, विद्युत व्यवस्थेसह मोबाईल चार्जिंग सुविधा आणि अग्निशमन यंत्रणा दादरच्या शिवाजी पार्क येथे तैनात करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने प्रभादेवी, चैत्यभूमीपर्यंत शेड बांधण्यात आले असून, चैत्यभूमीवर दुकाने सजली आहेत. या दुकानांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, फोटो, बिल्ले विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. 

राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे 6 डिसेंबर रोजी मुंबईतील सर्व शासकीय कार्यालये सुरू असतात. परंतु, या कार्यालयांना आता राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.