भाजपानं टूर अँड ट्रॅव्हल्स असं नविन खातं उघडलं असावं, राज ठाकरेंचा अमित शाह यांना टोला - राम मंदिराचं आमिष काय दाखवता
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 16, 2023, 8:36 PM IST
|Updated : Nov 16, 2023, 9:20 PM IST
ठाणे Raj Thackeray Criticized BJP : भाजपानं "टूर अँड ट्रॅव्हल्स" असं नविन खातं उघडलं आहे का? असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना केला आहे. काही दिवसापूर्वी अमित शाह यांनी निवडणूक प्रचाराच्या व्यासपीठावरून आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला मोफत राम मंदिराचं दर्शन घडवू असं विधान केलं होतं. या विधानाचा राज ठाकरे यांनी समाचार घेतलाय. राम मंदिराचं आमिष काय दाखवता, सत्तेतील कामं दाखवा, असं मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्य केलंय. मध्यप्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना राम मंदिराचं मोफत दर्शन घडविण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानातून अमित शाह यांच्यावर टीका करण्यात आली. राज ठाकरे यांनी देखील शाह यांनी केलेल्या विधानांचा समाचार घेतलाय.