मंत्री छगन भुजबळ करणार समता पुरस्काराचं वितरण; कार्यक्रमस्थळी तगडा बंदोबस्त, आज काय बोलणार याकडं सर्वांचंच लक्ष - महात्मा फुले
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/28-11-2023/640-480-20130908-thumbnail-16x9-maratha-vs-obc-reservation.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Nov 28, 2023, 11:50 AM IST
पुणे Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे राज्यभर ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडं मंत्री छगन भुजबळ हे देखील आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मराठा आणि ओवीसी आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटाला आहे. जरांगे आणि भुजबळ हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर असताना स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव हे सर्किट हाऊस इथं आले. त्यांनी छगन भुजबळ यांच्या गाडीच्या समोर उभं राहून तुमची गाडी एका हातावर असून फोडायला वेळ लागणार नाही. भुजबळ साहेब मराठा ओबीसी वाद लावू नका, असा इशारा सोमवारी दिला होता. आज महात्मा फुले यांच्या 133 व्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं समता परिषदेच्या वतीनं समता पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. मराठा संघटनांच्या विरोधानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी.