Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील सभेपूर्वी शिवनेरी किल्ल्यावर; शिवाई देवी, छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं दर्शन - छत्रपती शिवाजी महाराज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-10-2023/640-480-19814457-thumbnail-16x9-maratha-reservation-protest.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 20, 2023, 3:01 PM IST
पुणे Maratha Reservation Protest : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यातील खेड इथं सभा आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन करत आशीर्वाद घेतला. सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू झाली. या सभेसाठी पुणे जिल्ह्यातून त्याचबरोबर अन्य ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव सभास्थळी दाखल झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची राजगुरूनगर इथं सभा पार पडली. त्याअगोदर त्यांनी किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या समवेत अनेक समर्थक उपस्थित होते. शंभर एकरांवरील या सभेच्या आजूबाजूच्या शेतातील पिकं काढून ती जागा पार्किंगसाठी शेतकऱ्यांनी मोकळी करून दिली आहे. शुक्रवारी 20 ऑक्टोबरला सकाळी केटरर्स असोसिएशननं पन्नास हजार जणांच्या नाष्ट्याची सोय केली आहे. तालुक्यातील 106 गावांतून बसमधून समाज सभेला येणार आहे. या सभेसाठी पाचशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सभेसाठी जिल्ह्यातील पाच पोलीस उपाधीक्षक, 20 पोलीस निरीक्षक, 45 उपनिरीक्षक आणि 500 पोलीस तैनात करण्यात आले. सभास्थळी पार्किंगचा गोंधळ होऊ नये, म्हणून अंदाजे पन्नास एकरांत तीन सेक्शनमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे.