Man Climbed On Transformer : जीव देण्यासाठी माथेफिरू ट्रान्सफार्मवर चढला, अन् पुढे झाले असे काही.. - शिर्डीत माणूस ट्रान्सफॉर्मरवर चढला
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - शिर्डीत विद्युत रोहित्रावर चढलेल्या माथेफिरूला सुखरुप खाली उतरवण्यात अग्नीशमन विभागाला यश आले आहे. शिर्डीतील आरबीएल बॅंक चौकात असलेल्या 11 केव्ही विद्युत ट्राम्सफार्मवर एक माथेफिरु आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चढला होता. मात्र त्याचे दैव बलवत्तर म्हणून नेमके त्याचवेळी कोपरगावहून येणाऱ्या 132 मुख्य विद्युत वाहिनीवर ट्रिपिंग येऊन ती वाहिनी बंद झाली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला व त्या इसमाचे प्राण वाचले. त्यानंतर नगर परिषदेच्या अग्नीशमन विभागाने त्याला सुखरुप खाली उतरवले. हा माथेफिरू जीव देण्यासाठी रोहित्रावर चढला पण त्याचवेळी मुख्य वाहिनी बंद पडल्याने त्याचा जीव वाचला. त्या व्यक्तीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून वीज वितरण कंपनी त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार आहे.