Maharashtra Political Crisis : अजित पवारांसह छगन भुजबळ, धनंजय मुंडे... ; पाहा शपथविधीचा व्हिडिओ - Ajit Pawar deputy cm
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी दुपारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतर आठ समर्थक आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या आमदारांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे - पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील आणि धर्मरावबाबा अत्राम यांचा समावेश आहे. आता अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे प्रथमच झाले आहे की, एकाच मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्री कारभार सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे, अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात 3 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आजच्या शपविधीसह, अदिती तटकरे या आता शिंदे सरकारमधील पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत.