Yeola Government Hospital रूग्णालय परिसरातच दारूच्या बाटल्या, येवल्यातील उपजिल्हा रूग्णालयातील प्रकार - Liquor bottles in hospital premises
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक ( येवला ) : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ( Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal ) यांनी येवल्याचा विकास करताना या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय देखील बांधले असून सुसज्ज अशा रुग्णालयात विविध सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या. मात्र, याच रुग्णालयाच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य तसेच दारूच्या बाटल्या पडलेल्या असल्याने ( Liquor bottles in Yeola Hospital )संबंधित प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. या रुग्णाला परिसरात दारूच्या पार्ट्या होतात की काय? सध्या हाच मोठा प्रश्न रुग्णालयातील नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. येवला शहरातील रुग्णांना बाहेर जावे लागू नये याकरिता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपजिल्हा रुग्णालय बांधले असून रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून या ठिकाणी मद्यपी पार्ट्या करत तर नाही ना असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असून या रुग्णालय परिसरामध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या पडल्याचे चित्र दिसत होते वारंवार या गोष्टी प्रशासनाकडे लक्षात आणून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या आरोप येथील नागरिकांनी केला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पॉकिट,गुटख्याच्या पुड्या पडल्याचे दिसत असून हे रुग्णालय आहे की दारूचा अड्डा असा मोठा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST