K Kavitha In Solapur : तेलंगणाच्या आमदार कविता सोलापुरमधील ‘बत्तुकम्मा’ उत्सवात सामील; सोलापूर महानगरपालिकेवर नाराजी व्यक्त करत म्हणाल्या... - K Kavitha Akka In Solapur
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 23, 2023, 10:37 AM IST
Kavita In Solapur सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर (K Chandrasekhar Rao) यांच्या कन्या आमदार के. कविता (Kavita Akka) सोलापूरात साजरा होणाऱ्या बत्तुकम्मा उत्सवात (Bathukamma) सहभागी झाल्या आहेत. यावेळी सोलापूरकरांचा उत्साह पाहून आमदार कवितादेखील भारावून गेल्याचं दिसून आलं. पुंजाळ मैदानावर आमदार कविता यांनी व्यासपीठावर येऊन सोलापूर शहराचा इतिहास सांगितला. पण यावेळी त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील उद्योगवाढ झाली नाही. सोलापूर महानगरपालिकेने सोलापूर शहराचा म्हणावं तसा विकास केला नाही, अशी खंत आमदार कविता यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर कविता ब्रतुकम्मा उत्सवा दरम्यान करण्यात येणाऱ्या पारंपरिक नृत्यात सहभागी झाल्या होत्या. तेलंगाणा येथील आमदार सोलापुरातील एका सार्वजनिक उत्सवात सर्वसामान्य महिलांसारख सहभागी झाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला.