Jaipur Mumbai Train Firing incident: सुरक्षा कर्मचारीच जर असे कृत्य करत असतील, तर याचा सखोल तपास झाला पाहिजे- मनिषा चौधरी - BJP MP Manisha Chaudhary

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 31, 2023, 12:30 PM IST

मुंबई : जयपुर मुंबई एक्सप्रेस गाडी नंबर 12957 मध्ये साडेपाच वाजण्याच्या सुमाराला गोळीबाराची घटना घडली. या गाडीतील कोच B5 मध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. आरपीएफ जवानांचा आपसात वाद झाल्यामुळे ही घटना घडली आहे. कॉन्स्टेबल चेतन कुमार याने हा गोळीबार केला, नंतर भाईंदर स्थानकातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन प्रवासी मुंबईचे आहेत. जे मोहरम सणासाठी जयपुर राजस्थान येथे गेले होते. मात्र, मुंबईला येताना रेल्वेत झालेल्या गोळीबारात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सर्व मंत्री सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. यासारख्या घटना घडल्या नाही पाहिजे, जर सुरक्षा कर्मचारीच जर असे कृत्य करत असतील, तर याचा सखोल तपास झाला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. मृताच्या नातेवाईकांनी देखील आपल्याला पोलिसांचा फोन आल्यानंतर ही घटना कळाली, असे सांगितले. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.