Dharmarao Baba Atram ON Minister Post: मी मंत्री होईल हे मला माहीत होतं - धर्मराव बाबा आत्राम
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : मी चारवेळा निवडून आलो आणि चारदा मंत्री झालो. यावेळीसुद्धा मी मंत्री होईल याची मला अपेक्षा होती. अजित पवारांमुळे यावेळी मी मंत्री झालो. राजकीय परिस्थितीत घडामोडी घडत असतात. आम्ही सर्व राष्ट्रवादीचे आहोत आणि अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत, असे वक्तव्य धर्मरावबाबा आत्राम यांनी (Dharmarao Baba Atram ON Minister Post) आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केले. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम गडचिरोलीला जाण्यासाठी नागपूरला आले असता बोलत होते. (I would become a minister) नव्या मंत्र्यांचे खातेवाटप व्हायचे तेव्हा होईल. मात्र, विदर्भाला न्याय देण्याचे काम आदिवासी मागासवर्गीय गडचिरोली जिल्ह्यातून कॅबिनेट मंत्री म्हणून मी करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. विदर्भाच्या विकासाचे राजकारण करू. आज आमच्याकडे अजित पवारांसह ४० आमदार आहेत. लवकरच आमदारांची संख्या ही ५० होईल. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही राजकारण करू. विदर्भ मागासलेला आहे. आम्ही त्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करू असे देखील आत्राम म्हणाले आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री गडचिरोली दौरा करतील. कोणाच्याही मनात अस्वस्थता नाही. लवकरच गडचिरोलीला 'शासन आपल्या दारी' यासाठी मुख्यमंत्री यांचा दौरा आहे. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा असणार आहे, असे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.