भंगाराच्या दुकानाला भीषण आग; साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान - अग्निशमन दलाच्या जवानांना यश
🎬 Watch Now: Feature Video
नवी मुंबई नवी मुंबईतील ऐरोली गोठीवली सेक्टर २३, माऊली हाईट्सच्या गेट मागील एका भंगाराच्या दुकानाला सकाळी १० च्या दरम्यान आग लागली. आगीचा वेग झपाट्याने वाढत असताना ऐरोली अग्निशमनच्या 2 गाड्या व कोपरखैरणे येथून 1 गाडी घटनास्थळी ताबडतोब हजर झाली. ऐरोलीचे केंद्र अधिकारी गजेंद्र सुसविरक यांनी घटनास्थळी पाहणी करून तात्काळ आग विझविण्यासाठी प्रयत्न केले आहे. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सदर भंगारचे दुकाने हे शेड मारून बनवले होते. या दुकानातील मागच्या बाजूस डेकोरेशनचे काही सामान ठेवले होते. या सामानाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST