Heavy Rain In Kolhapur : सिलेंडरसह वाहून जाणारा तरुण वाचला; पाहा व्हिडिओ - cylinder survived
🎬 Watch Now: Feature Video

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy rain in Kolhapur district ) सुरू आहे. परिणामी अनेक ओढ्यांना तसेच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ( water level of Panchganga river increased ) सुद्धा आता इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. अशातच कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुण पाण्यातून वाहत जाता जाता वाचला आहे. यामध्ये एक तरुण आपल्या दुचाकीवरून घरगुती सिलेंडर घेऊन पुराच्या पाण्यातून घेऊन जात होता. मात्र ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्यातून वाहत जात असताना नागरिकांनी वाचवले. पाहा व्हिडिओ.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST